सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

श्रीपाद सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम, मुंबई पुणे सह सोलापूरच्या 200 दत्तभक्तांना घडविले श्रीपादांचे दर्शन

सोलापूर : प्रतिनिधी

श्रीपाद सेवा मंडळ, सोलापूर यांचे वतीने श्री गुरुद्वादशी निमित्त यंदाच्या वर्षीचा कुरवपूर यात्रा सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांची तपोभूमी असलेल्या कुरवपूर क्षेत्री सकाळी कृष्णा नदीच्या पात्रात छाटी व दंड स्नान हा उत्सवातील प्रमुख धार्मिक विधी रविंद्र पुजारी गुरुजी व राजेंद्र पुजारी गुरुजी यांचे हस्ते संपन्न झाला.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करीत हजारो दत्तभक्त यावेळी उपस्थित होते. यावेळी महिलांनी हरभ-याची दाळ, गूळ, वस्त्र अर्पण करून कृष्णा नदीची ओटी भरली आणि त्यासोबत दीपदान सोहळा संपन्न झाला.

हजारो दीप कृष्णा पात्रात तरंगत असल्याचे दृष्य नयन मनोहर दिसत होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य आचार्य वरद नाईक यांनी केले. त्यानंतर दत्तभक्तांच्या कल्याणार्थ संकल्पपूर्वक महापंचामृताभिषेक, मंगलारती आणि अलंकार पूजा संपन्न झाली.

 

मंदिरात नामघोष करीत प्रदक्षिणा सेवा अर्पण करण्यात आली. श्री टेंबे स्वामी महाराजांच्या गुहेचे दर्शन घेऊन ऐतिहासिक महत्व असलेल्या विशाल वटवृक्षाच्या छायेत नामस्मरण झाल्यानंतर गुरुद्वादशी दिनाचे महत्त्व ज्योतिषाचार्य माधवराव कुलकर्णी यांनी विशद केले.

 

श्रीक्षेत्र कुरवपूर महात्म्य या विषयावर प्रख्यात कीर्तनकार वरद नाईक, पुणे यांनी प्रवचन सेवा सादर केली. सायंकाळी विठ्ठल बाबा येथील आश्रमात संगीत सेवा सादर करण्यासाठी खास पुण्याहून आलेल्या पंडित संजयजी गरुड, पल्लवी पोटे, विलासराव कुलकर्णी, ख्यातनाम तबला वादक पंडित उमेशजी मोघे, झंकार कुलकर्णी यांनी गायन, वादन सेवा सादर केली.

 

विविध दत्त भक्तिगीते सादर करून या सर्वांनी वातावरण श्री दत्तभक्तिमय केले. यावेळी सोलापूर पुणे मुंबई, परभणी, वाई, हैद्राबाद येथून मोठ्या प्रमाणात दत्तभक्त उपस्थित होते.

ही यात्रासेवा यशस्वी करण्यासाठी ज्योतिषाचार्य माधव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विद्याधर चौधरी, व्यंकट कुलकर्णी, सचिन सराफ, भगवान परळीकर, पंढरी जाधव, शरद माने, कौशिक कुलकर्णी, आनंद ढेपे, रामचंद्र म्हमाणे, संजीवनी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!