सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या आमदाराने मनोज जरांगे पाटलांना दिला जाहिर पाठिंबा, माढा तालुक्यात चर्चेला उधाण
आमदार बबनदादा शिंदे यांच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवली सराटीत जाऊन स्वतः भेटून दिले

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला केलेल्या मागणीनुसार आरक्षण मिळावे यासाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. गेले 3 दिवसापासून पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणी साठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत.
त्या प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटी जि. जालना येथे त्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला. तसेच माढा मतदारसंघाच्या वतीने आ. बबनदादा शिंदे यांच्या पाठिंब्याचे पत्र देखील दिले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाची आग्रही भूमिका मांडली होती. त्याचबरोबर वेळोवेळी मी देखील आंदोलनात सहभागी झालो. यापुढे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असणार आहे.
याप्रसंगी समवेत खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे, जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब उबाळे, उपळाई खुर्द चे सरपंच संदीपभैय्या पाटील,
शिव विचार संघटनेचे अध्यक्ष विजयदादा खटके पाटील, बाबासाहेब चव्हाण, ढवळसचे सरपंच संतोषदादा अनभुले, शिरीष पाटील, मनोज गायकवाड, लक्ष्मण तात्या जाधव, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, सचिन पवार, गणेश व्यवहारे, अमोल लटके, नाना बागल, राजेंद्र उबाळे, सऺभाजी उबाळे, लखन चांदणे, माऊली दळवी, राजेंद्र यादव, गजानन परबत, अण्णासाहेब पाटील, सुदर्शन अनभूले, लखन डोके, बापू शिंदे यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.