पिंटू इरकशेट्टी यांची योग्य निवड, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते NCP सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक सचिव पदी निवड

सोलापूर : प्रतिनिधी
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचार आणि जाहीर सभेसाठी कर्जत जामखेडचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे स्टार प्रचारक रोहित पवार हे सोलापुरात आले होते.
पत्रा तालीम येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी प्रविण इरकशेट्टी यांना नियुक्तीपत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रविण इरकशेट्टी हे पूर्वीपासून शरद पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन पत्रा तालीम भागासह सोलापूर शहरात उत्तमरीत्या काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीची अनेक पदे भूषविले आहेत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, वंचित, अंध अपंग यांना न्याय देण्याचे काम ते अनेक वर्ष झाले करत आहेत. या कामाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पत्रा तालीम येथील जाहीर सभेत देण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे, मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन नरोटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित होते.