महाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
जुन्याच विमानतळाचे लोकार्पण कसे होईल?, खासदार प्रणिती शिंदेचा सवाल, भाजपाच्या दोन्ही आमदार विमानतळ पाहणीवर केली टीका

सोलापूर : प्रतिनिधी
खासदार प्रणिती शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी सोलापूर विमानतळाच्या लोकार्पण या विषयावर भाष्य करताना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या पाहणीवर टीका केली. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले ते पुढील प्रमाणे..
- > सोलापूर विमानतळ हे भारतीय संरक्षण प्राधिकरणांनी सप्टेंबर 1948 मध्ये पूर्व हैदराबाद राज्यावरील पोलिस कारवाईच्या कारवाई दरम्यान बांधले होते. ऑपरेशन नंतर बेस मात्र राखला गेला नाही. (मेंटेनन्स केले गेलेले नाही.)
- > मा. सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 1987 साली हे सोलापूर विमानतळ पुन्हा बांधण्यात आले. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चालविले आणि देखरेख करण्यात आली.
- > किंगफिशर रेड या विमान कंपनीने ATR 72 या विमानाद्वारे फेब्रुवारी 2009 मध्ये आठवड्यातून चार वेळा मुंबईसाठी विमान सेवा चालवली. परंतु ऑगस्ट 2010 मध्ये किंगफिशर एअरलाईन ही कंपनी डबघाईला आल्यामुळे हि विमान सेवा बंद करण्यात आली.
- > त्यानंतरही या सोलापूर विमानतळावर अनेक खाजगी व सरकारी विमानांची व हेलिकॉप्टरांची आगमन व प्रस्थान होत राहिले. यामध्ये ४ सप्टेंबर २०१६ रोजी मा. सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी एका दिवसात सोलापूर विमानतळावर २७ विमानांचे आगमन व प्रस्थान झाले. यामध्ये मा. राष्ट्रपती पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे विमानांचा समावेश होता.
- > यानंतर सोलापूर विमानतळ येथे देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केले असता या विमानतळाबाबतीत DGCA ने काही त्रुटींचे कारण देत या विमानतळाचा परवाना प्रलंबित ठेवण्यात आला. यानंतरही पंतप्रधानांपासून ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री व खाजगी व्यक्तींचे विमानांचे आगमन व प्रस्थान या विमानतळावर झालेले आहेत.
- > DGCA ने परवानगी नाकारल्यानंतर विमानतळ प्राधीकरणाने त्यावेळेस अस्तित्वात असलेले रन-वे ची लांबी वाढवून सुधारणा केली. तसेच विमानतळाच्या इमारतीचे विस्तारीकरण करुन नविन रंगरंगोटी केली. विमानतळाच्या कुंपणाची उंची वाढवून त्यास बार्बेड वायर लावण्यासाठी सुमारे ३५ कोटी खर्च करण्यात आले.
- > आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत कोणत्याही विमान कंपनीने सोलापूर पासून अन्य शहरासाठी विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केलेली नाही.
- > त्यामुळे अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या व कार्यरत असलेल्या विमानतळाचे उदघाटन व लोकार्पण कसे ? बिल्डींग पासून ते रन-वे अगोदरपासूनच अस्तित्वात आहेत… ज्याचे फक्त नुतनीकरण केले गेले… त्या नुतनीकरणाचे उदघाटन म्हणण्यास हरकत नाही.. पण हे भाजपाचे लोक असं भासवत आहेत की हे सोलापूर विमानतळ आत्ताच नविन बांधले आहे.. बहुतेक हे भाजपाचे लोकं सोलापूरच्या जनतेला मूर्ख समजत आहेत कां?
या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे पदाधिकारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.