सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्टंटबाज आंदोलन करणा-याचा काळ्या फिती लावून निषेध, कर्मचारी संघटना आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी

अतुल खुपसे, अध्यक्ष जनशक्ती संघटना, उपळवटे, ता. माढा. यांनी 15 जून 2024 रोजी पुनम गेट, जिल्हापरिषद, सोलापूर येथे बेकादेशीर रित्या प्रति अधिकारी खुर्चीत बसवुन त्यास तोंडास काळे फासुन भारतीय चलनी नोटाची उधळपट्टी केली आहे. सदर घटना Whatsapp व इतर Social Media च्या माध्यमातुन प्रसारित होऊन बांधकाम विभागाची व अधिकारी प्रतिमा मलीन केली आहे. भारतीय चलनी नोटाचा वापर आंदोलनाकरीता चुकीच्या पध्दतीने करुन भारतीय चलन नियमाचा व भारतीय दंड सहिंतेचा भंग केलेला आहे.

सदर घटनेमुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या भावना अत्यंत तीव्र असून अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करुन अधिका-यांवर दबाब निर्माण करण्याचा, मानसिक खच्चीकरण करण्या-या प्रवृत्तीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागातीलअधिकारी, कर्मचारी यांनी गुरुवार 20 जून 2024 रोजी काळया फिती लावून निषेध केला. सात रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवारात निषेध सभा घेवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी अधिकाऱ्यांवर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असो, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो, बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्याविरुध्द कारवाई करावी, स्टंटबाजीचे आंदोलन करणा-याचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर, राजपत्रित अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य , कनिष्ठ अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना यांचे वतीने करण्यात आले. या आंदोलनात वर्ग-1 ते वर्ग-4 पर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून आंदोलन यशस्वी केले.

या आंदोलनास महसूल कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, सहकार कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संघटनांनी उपस्थित राहून आपला निषेध नोंदविला आहे.

या निषेध सभेत शंतनु गायकवाड, राजीव साळुंके, अशोक इंदापूरे, श्रीमती. एस.ए. पाटील, कार्यकारी अभियंता, ए.टी. निमकर, कार्यकारी अभियंता, एच.आर. चौगुले, कार्यकारी अभियंता, एम.आर. ठाकरे , कार्यकारी अभियंता, आर.एम. जेऊरकर, उपअभियंता, श्रीमती. अर्चना आघाव, आर.एस. चंदेले, समीर राऊळ, अमृत कोकाटे, राजेंद्र जमादार, विजयकुमार पोतदार, सुजय वाघचवरे, राजेंद्र जंगम, यांनी आपल्या भाषणातून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यापुढे अशा घटना घडल्या तर तातडीने प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. संजय माळी अधीक्षक अभियंता यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभारल्या बददल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!