शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, बँकेच्या शेती कर्ज विषयीची माहिती, शेती ही फायद्याची यावर व्याख्यान.

सोलापूर : प्रतिनिधी
गवळी वस्ती तालीम संघ आयोजित शेती ही फायद्याची आहे या विषयावर शेतकऱ्यांसाठी व्याख्यान व शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्र प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ लालासाहेब तांबडे खरीप व रब्बी हंगाम लागवड तंत्रज्ञान या विषयी माहिती देणार आहेत.
तसेच भगवान बनसोडे एरिया सेल्स मॅनेजर ॲक्सिस बँक लिमिटेड सोलापूर हे शेतीसाठी बँकेचे शेती कर्ज विषयी माहिती देणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी यांनी केले आहे. हे शिबिर शनिवार 22 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता गवळी वस्ती तालीम गवळी वस्ती देगाव रोड सोलापूर येथे आयोजित केले आहे.
शेतीमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी रामराव पाटील द्राक्ष बागायतदार, संतोष वाघमोडे केशर आंबा बागायतदार कुरुल, रवींद्र विठ्ठल पवार कारले शेती कोथाळे, आशिष शंकर पाटील केळी व पपई बागायतदार औज, कृषी भूषण शशिकांत पुदे शेज बाबळगाव यांचा सत्कार करणार आहोत. अशी माहिती गवळी वस्ती तालीम संघाचे प्रमुख हेमंत पिंगळे यांनी दिली.