महाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
अनगरकर पाटील परिवारावर निष्ठेने आव्हानात्मक काळात विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार : राजन पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेली मरगळ झटकून टाकत पुन्हा नव्या उमेदीने पक्ष संघटनात्मक आणि विकासात्मक वाटचाल सुरू ठेवण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी अनगर येथील स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संवाद साधला.
अनगरकर पाटील परिवारावर निष्ठेने आव्हानात्मक काळात विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी कृतज्ञता भावनेतून यापुढील काळातही अविरतपणे झटत राहणार असल्याबाबत सर्वांना अश्वस्त केले.
यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, कल्याणराव पाटील,यांच्यासह पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.