जिजामाता प्रशाला कोंडी उत्तर सोलापूर ची सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट

सोलापूर : प्रतिनिधी
2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्य सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालया मार्फत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचालित जिजामाता प्रशाला कोंडी च्या अध्यक्षा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रेरणेने व संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ व सचिवा शिल्पाताई ठोकळ यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधव यांच्या नियंत्रणाखाली प्रशालेचे एकूण 35 विद्यार्थी व प्रशिक्षक सारंग पाटील आणि विजयकुमार लांडगे पोलिसांचा अभिमान सोहळा पाहण्यात आला.
त्याप्रसंगी श्वान प्रशिक्षण व श्वानाच्या. कसरती. बॉम्ब शोध कौशल्य सादर करण्यात आले. त्यानंतर पोलीस खात्यातील शस्त्र संपत्ती ची माहिती सविस्तरपणे पोलीस अधिकारी श्री मुजावर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक श्री शिंदे हे होते. या कार्यक्रमात सहभाग घेणे बाबत पोलीस ग्रामीण मुख्यालयाचे कर्मचारी श्री मुसळे यांनी तसेच तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी वर्ग व त्यांचे इतर कर्मचारी पैकी श्री देवकर यांनी परिश्रम घेतले. पोलिस हवालदार श्री देवकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे खाऊ वाटप केले.
सर्व महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयाचे आणि तालुका उत्तर सोलापूर पोलिस ठाण्याचे मनःपूर्वक धन्यवाद सप्रेम आभार सारंग दशरथ पाटील, सहशिक्षक यांनी मानले.