सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

प्रभाग 18 व 20 मधील पदयात्रेत हजारों नागरिकांचा सहभाग, हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार : चेतन नरोटे

सोलापूर : प्रतिनिधी

249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या प्रचारार्थ प्रभाग 18 व 20 मधील जनतेच्या सहकार्याने स्वागत नगर MSEB ऑफिस भीमाशंकर टेकाळे यांच्या घरापासून भव्य पदयात्रेला सुरुवात करून नागेंद्र नगर, विनू गोपाल नगर, न्यू आनंद नगर, प्रतिभा नगर, गुरुनाथ नगर, मुमताज नगर, लता देवी नगर, जय हनुमान नगर, मार्कंडे नगर, कुमठा नाका, संजय नगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, अंत्रोळीकर नगर, राहुल हाउसिंग सोसायटी येथे समारोप करण्यात आले.

यावेळी चेतन नरोटे म्हणाले की, हद्दवाढ भागातील आणि मतदारसंघातील जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून पदयात्रेदरम्यान मिळालेला प्रतिसाद जनसेवा करण्यासाठी मला प्रोत्साहन देत आहे. पदयात्रेत सहभागी होऊन मला साथ देणाऱ्या प्रभाग 19 मधील रहिवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.

या पदयात्रेत माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, अनुराधा काटकर, विनोद भोसले, भीमाशंकर टेकाळे, सुदीप चाकोते, गणेश डोंगरे, प्रमिला तूपलवंडे श्रीधर काटकर यांच्यासह प्रभागातील नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!