प्रकाश वालेंच्या पुढाकाराने भाजपाच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचा जल्लोष, भर पावसात प्रणिती शिंदेंच्या विजयाचा जल्लोष

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विजयी झाल्या बद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळी वेस परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला.
आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्या, दहा वर्षात इथले खासदार निष्क्रिय ठरले कोणतेही विकास कामे केली नाहीत, 2009 मध्ये विमानतळासाठी एकव्हायर केली परंतु तेही काम पूर्ण केले नाही. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा त्रास झाला आहे. पुढील पाच वर्षात खासदार प्रणिती शिंदे या भरपूर काम करून दाखवतील सबंध लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आभार. विमानतळाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न या सर्व प्रश्न खासदार प्रणिती शिंदे मार्गी लावतील असे म्हणत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे, बाळासाहेब मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, जगदीश जम्मा, रेवणसिद्ध आवजे, प्रवीण वाले, शंकर सातभाई, लोकेश इरकशेट्टी, सिद्धू निशाणदार, प्रशांत आवजे, सागर दीक्षित, प्रमोद हिंगमिरे, शिवा माळशेट्टी, जयेश जोशी, निलेश मसरे, अजिंक्य शिंदे, मयुर वाले, गणेश कळके, राजू म्हेत्रे, पुष्कराज मेत्री, अमोल साखरे, कौशिक वाले, चिदानंद मसरे, सचिन बेलुरे, सिद्धार्थ खुने, गणेश नागशेट्टी, अविराज वाले, राहुल पसारगे, शुभम उळागड्डे, शिवराज हिंगमिरे, योगेश हदरे, दीपक सातभाई, राहुल मसरे, सोमनाथ कळके, नागेश रेशमे, योगेश सतभाई, विशाल मुस्के, संदीप जवळकर, प्रमोद मोकाशी, गुरुशांत मोकाशी, शुभम महिंद्रकर, किरण पांढरे आदी उपस्थित होते.