सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
फारूक शाब्दी यांनी डोअर टू डोअर करत मतदारांशी साधला संवाद, नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक भागातील येणाऱ्या अडीअडचणी नागरिकांना जाणून घेतल्या आणि येणाऱ्या काळात या सर्व अडचणी सोडू असा शब्द स्थानिक नागरिकांना दिला.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कुमठा नाका परिसरात एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी पदयात्रेतून, घरोघरी भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला, या परिसरात एमआयएमची छाप पडली.
फारुख शाब्दी यांच्या सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे वातावरण निर्माण झाले आहे. फारूक शाब्दी यांनी हिंदू मुस्लिम भेदभाव न करता सामाजिक सलोखा राखत सोलापूर शहर मध्य च्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.