विजय संकल्प मेळावा उत्साहात संपन्न, संविधान बदलण्याचा अधिकार किंवा हिम्मत कुणाकडेही नाही : विजय देशमुख

सोलापूर : प्रतिनिधी
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर पी आय (आ), लहुजी शक्ती सेना, मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 5 मध्ये विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. विजय सि. देशमुख यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी असलेली कटिबद्धता या संकल्प मेळाव्यात दाखवून दिली. दलित समाजाच्या उज्ज्वल भविष्याच्या उभारणीसाठी त्यांनी सर्वाधिक निधी मिळवण्यात यश मिळवले आहे, ज्याचा उपयोग समाजाच्या सक्षमीकरणासाठी करण्यात येत आहे.
जनतेने विजय देशमुख यांच्या अथक प्रयत्नांची दखल घेतली आहे. त्यांचे विकासकार्य, समाजासाठी असलेली बांधिलकी, आणि संविधानाच्या रक्षणासाठी घेतलेली ठाम भूमिका पाहून जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. त्या मुळेच जनतेने पुन्हा एकदा विजय देशमुख यांना येत्या २०नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करून विधानसभेत पाठवण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. स्वाती समाधान आवळे, भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, डी.के ग्रुप चे अध्यक्ष दशरथ कसबे, समाधान आवळे, मा. संदीप दुगाने मा. श्रीकांत रणदिवे, नामदेव भोसले,महेश भिसे, किशोर बोराडे, आकाश खवळे,अतिश कांबळे, पुष्पराज पाटोळे, ऋषिकेश रणदिवे,सुशांत रणदिवे,ज्वाला शिंदे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य लाडक्या बहिणी व नागरिक उपस्थित होते.