मराठा व्हिजन न्यूजच्या बातमीची दखल, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने ॲक्शन मोडवर, डॉक्टर अन् परिचारिकेवर वेतन कपातीची कारवाई

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका दवाखान्यातील सत्य परिस्थितीचा आढावा मराठा व्हिजन न्यूज च्या माध्यमातून मांडण्यात आला होता. आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांच्या पहिल्या दिवशी स्वागत अनेक कर्मचारी संघटनांनी केले यावेळी सोलापूरकरांच्या असणाऱ्या अपेक्षा आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी काय करावे याविषयीचे वृत्त न्यूज च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते. न्यूजच्या माध्यमातून मांडलेली परिस्थिती जशी आहे तशीच दवाखान्यात आरोग्य अधिकाऱ्यांना दिसून आली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात करून नागरिकांच्या अपेक्षापूर्ती कडे वाटचाल सुरू केल्याचे पहावयास मिळत.
महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी अचानक महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना अचानक भेट देत त्यांची तपासणी केली. यावेळी आरोग्य केंद्रात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना कामाचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामात निष्काळजी पणा करणाऱ्या एक डॉक्टर व एका परिचारिकेचे एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई नूतन आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केली.
महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी गांधीनगर परिसरातील दाराशा प्रसूतिगृह, नई जिंदगी आणि काळी मज्जिद येथील आरोग्य केंद्रास भेट देत तपासणी केली. आरोग्य केंद्र व दवाखाना परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसला. कर्मचारी गणवेशात नसल्याचे आढळले. डॉक्टर कर्तव्यावर गांभीयनि काम करत नसल्याचे दिसले. त्या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांना डॉक्टरांबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती दिली. एकूणच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे आढळले. उपचारासाठी आलेल्या गरजू गरीब लोकांना योग्य उपचार व मार्गदर्शन होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कर्तव्यावर असताना कामात निष्काळजीपणा करताना आढळल्यास यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिला आहे.
महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना भेट दिली. यावेळी कर्मचारी व डॉक्टर यांच्या कामात गांभीर्य नाही, असे दिसले. दवाखान्यात अंधार असल्याचे दिसले. स्वच्छतेचा अभाव होता. या यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.