बचत गट आणि महिलांना रोजगार निर्मितीवर भर देणार : आमदार रोहित आर आर पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव तथा युवा आमदार रोहित आर आर पाटील यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी दिलीप कोल्हे यांनी सपत्नीक त्यांचा सत्कार केला. तेजस्विनी महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. बचत गट, महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिलीप कोल्हे यांच्यासमवेत आमदार रोहित आर आर पाटील यांनी चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे, भाजपा शहर चिटणीस शेखर फंड, प्रभाकर बाबर, रणजित कोल्हे, अनिकेत लामतुरे, धनंजय सुतार, चेतन चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, वंदना जाधव, मोनाली कोल्हे, वनिता कदम, सौ अबोली दुद्दे, यांच्यासह दिलीप कोल्हे युवा मंच सदस्य उपस्थित होते.