मनोज लोंढे यांची निवड, भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्ष पदी निवडीनंतर अनेकांनी दिले शुभेच्छा

सोलापूर : प्रतिनिधी (पुणे)
मनोज लोंढे यांनी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या सर्व क्षेत्रात समाज उपयोगी काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांची अनेक संघटनेत उच्च पदावर निवड करण्यात आली आहे परंतु यंदाची झालेली निवड ही खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्यासाठी निवड झाली असल्याचे बोलले जात आहे.
भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते आणि शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या प्रमुख उपस्थितीत भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षपदी मनोज लोंढे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र देखील त्यांना मुंबई येथे देण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत भिमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, मुंबई अध्यक्ष शशिकांत बनसोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख एन के कांबळे, मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीनंतर सोलापूर शहर जिल्ह्याचा महाराष्ट्रातील अनेकांनी मनोज लोंढे यांना शुभेच्छा दिल्या.