सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीची 2 डिसेंबर रोजी स्थापना समारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहराचे गतवैभव, परिवर्तन आणि विकास करण्यासाठी दोन डिसेंबर 2024 सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता 1593,कुचन नगर (पद्मशाली चौक)येथे खालील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या काही वर्षापासून सोलापूर शहर हे शासकीय व सामाजिक स्तरातून विकास कुंटल्याचे परिस्थितीत दिसून येते म्हणून याबाबत सोलापूर शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिक बंधू भगिनींच्या सहयोगाने सोलापूर शहराला गतवैभव व परिवर्तन घडविणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे याच उद्देशाने मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीची स्थापना दिनांक 2 डिसेंबर सोमवार रोजी उद्योजक रामारेड्डी सर बालाजी अमाईन्स परिवार, बिपिनभाई पटेल उद्योगपती,अतुल कोटा आर्किटेक्चर,मधुकर जक्कन सर, डॉ.राजेश फडकुले सर,राजू रोडगीकर, मुझ्झो जमादार, विश्वनाथ राठोड साहेब , या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

तरी सोलापूर शहरातील नागरिक बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!