आमचं समीकरण जुळलं असतं तर सुपडा साप केला असता, मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही : मनोज जरांगे पाटिल
गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडण्यासाठी आशीर्वाद बळ आणि शक्ती दे म्हणत जरांगे यांनी श्री विठ्ठलाचे घेतले दर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते यावेळी पंढरपुरातील मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे उत्साहात स्वागत करत जेसीबीच्या माध्यमातून फुलांची मुक्त उधळण करण्यात आली.
दर्शना नंतर बोलताना म्हणाले, मी आरक्षण घेणार आणि ओबीसी मधूनच घेणार असा पुनरुच्चार करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवालीच्या घराघरात उपोषण होणार आहे समाजातल्या अनेकांची इच्छा आहे की मुंबईत जाऊन उपोषण करावे तसे सुद्धा होऊ शकते.
मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत दिशा ठरेल असे म्हणत मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईत एकवटण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडण्यासाठी आशीर्वाद बळ आणि शक्ती श्री विठ्ठलाकडे जरांगे यांनी मागितली. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 ते 32 नवनिर्वाचित आमदार आपली भेट घेऊन गेले आहेत सरकार स्थापन झाल्यावर अजून अनेक आमदार आपली भेट घेतील अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभेच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता आमचं समीकरण जुळलं असतं तर सुपडा साप केला असता, मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही, त्याला विकले नाही. समाज त्याच्या मताचा मालक आहे समाजाला जे वाटलं ते त्यांनी केलं, समाजावर कुठेही मनमानी केली नाही. असे स्पष्टीकरण जरांगे यांनी दिले.