महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास.
भाजपचा उमेदवार ऊसतोड कामगार राहिला नाही आता किती श्रीमंत झाला आहे ते पहा : नाना पटोले.

सोलापूर: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे. जनतेने त्याला संपण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व ४८ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला. सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. या प्रसंगी ते पत्रकारांना बोलत होते.
पटोले म्हणाले, जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आला आहे. यातून जनतेला देशातील जे तानाशाह सरकार आहे त्याला जनतेने खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. भर उन्हात देखील प्रणिती शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं आली, असल्याचे देखील पटोले म्हणाले. भाजपचा जो उमेदवार आहे. तो ऊसतोड कामगार राहिला नाही. आता तो किती श्रीमंत झाला आहे. ते तपासावे. भाजपने आता ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करण्याचे काम करू नये, असा टोला देखील पटोलेंनी लगावला.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रणिती यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.