एम राजकुमार यांनी जरांगे पाटील यांच्या सभा स्थळाची केली पाहणी, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली नियोजनाची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून याची सुरुवात सोलापूर मधून होणार आहे. सात ऑगस्ट रोजी सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभा होणार आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान शांतता रॅली निघणार आहे. याची तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अंतिम टप्प्यात आली आहे.
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्तालयात मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक आणि पोलीस विभागातील सर्व अधिकाऱ्यां समवेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभे संदर्भात बैठक घेतली.
यानंतर सायंकाळी 7:30 वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या जाहीर सभा स्थळाची पाहणी केली आणि काही सूचना केल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि त्यानंतर होणाऱ्या सभे संदर्भात नियोजन केलेली संपूर्ण माहिती सांगितली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा जेष्ठ समन्वयक दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, सुनिल रसाळे, प्रताप चव्हाण, अनंत जाधव, शशी थोरात, बाळासाहेब गायकवाड, बाबुराव शिरसागर, संजय सरवदे,
महेश सावंत, योगेश पवार, वैभव गंगणे, चेतन चौधरी, दिनेश जाधव, दत्ता जाधव, यांच्यासह युवक उपस्थित होते.
यासह पोलीस विभागातील पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त अजित बोराडे, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.