देवेंद्र कोठेंची शहर मध्य मध्ये साखर पेरणी, महासेवा शिबिरात १७७४ गरजूनी घेतला लाभ

सोलापूर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा सोलापूर शहराच्या वतीने मोफत ई-श्रम नोंदणी, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, मतदान नोंदणी व दुरुस्ती, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी सकाळी साडेआठ पासून नागरिक श्रीराम मंदिराकडे येण्यास सुरुवात झाले होते. एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळत होता. भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊ मधील सर्व पदाधिकारी व सदस्य नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते. यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्या वरील आनंद व समाधान दिसून येत होते.
उत्तम नियोजन आणि सूत्रबद्ध पद्धतीने शिबीराने एक नवा इतिहास रचला. हे सगळं शक्य झाले ते केवळ सर्व सहकाऱ्यांच्या परिश्रममुळे स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व योजनेतील संपूर्ण शासकीय शुल्क भरण्यात आली त्यामुळे नागरिकांना या शिबिराचा मोफत लाभ मिळाला.
शिबिरास शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव, माजी परिवहन सभापती लक्ष्मण गायकवाड, डॉ सूर्यप्रकाश कोठे, नागेश खरात यांनी भेट दिली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, नागनाथ सोमा, रवींद्र नक्का, सोलापूर शहरमध्य विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रभागाचे माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका राधिका पोसा, नगरसेवक मेघनाथ येमुल, उपाध्यक्ष भूपती कमटम, जय साळुंखे, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुनील गौडगाव, सावित्रा पल्लाटी, महिला आघाडी विजया वड्डेपल्ली, उद्योग आघाडी अंबादास बिंगी, शिक्षक आघाडी दत्ता पाटील, अनुसूचित जाती मोर्चा मारेप्पा कंपली,
शहर मध्य विस्तारक प्रकाश म्हता, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, सुपर वॉरियर्स आनंद बिर्रू, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, किरण भंडारी, ज्ञानेश्वर गवते, दास भंडारी, विश्वनाथ बदलापुरे, अनिल वंगारी, श्रीनिवास साई, मनोहर इगे, नागनाथ सोमा, रमेश यन्नम आदींसह भाजपाचे पदाधिकारी व स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.