मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे थाटात उद्घाटन
सोलापूरकरांना सोबत घेऊन सोलापूर शहराचे परिवर्तन करणार : विष्णू कारमपुरी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरच्या विकासासाठी व शहरवासीयांचे मूलभूत गरजा सोडविण्यांचा कोणताही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न केले नाही. त्यामुळे मी स्वतः सोलापूरकरांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा विकास व परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक व निमंत्रक विष्णू कारमपुरी यांनी समितीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रास्ताविक भाषणात उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिक बंधू भगिनींना दिले.
मी सोलापूर माझे सोलापूर या समितीचा उद्घाटन पद्मशाली चौक येथील कार्यालयात डॉक्टर राजेश फडकुले, आर्किटेक्चर अतुल कोटा, राजशेकर रोडगीकर, निवृत्त डीवायएसपी विश्वनाथ राठोड, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, प्रा. मधुकर जक्कन, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, स्वरांजली चॅनलचे दयानंद मामड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत व वेद ब्राह्मण बोल्ली (पंतुलू) यांच्या वेदमंत्र पठणाने विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते श्री भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी अतुल कोटा यांनी प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याचे योजना राबविण्यात येईल असे सांगितले, अनिल चव्हाण यांनी राजकीय विरहीत सेवा करणे हे आता गरजेचे बनले आहे. डॉक्टर राजेश फडकुले सरांनी सोलापूर शहराचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. असे म्हणाले. प्रा.मधुकर जक्कन यांनी सोलापूर शहराचा विकास केवळ सामाजिक संघटनाच करू शकते असे मत व्यक्त केले. दयानंद मामड्याल यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार संघटनेचे कामकाज चालावे असे अपेक्षा व्यक्त केले. श्री राजेशेखर रोडगीकर यांनी या संघटनेत सहभागी होऊन तन-मन धनाने काम करेन असे जाहीर केले. स्वरांजली न्यूज चैनल चे वृत्तलेखक भाऊसाहेब निळ यांनी जे का रंजीले गांजिलै त्यासी म्हणे आपले असे काम या संघटनेच्या माध्यमातून होईल नव्हे तर होणारच असे म्हणाले.
शेवटी विष्णू कारमपुरी यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील कामकाजाची रूपरेषा व उद्देश लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगताना सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीशैल वाघमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा आडकी यांनी केले. सदर प्रसंगी एड. मुनिनाथ कारमपुरी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास चिलवेरी, अनिल दंडगुळे, अमित भोसले, सोहेल शेख, भाऊसाहेब निळ, शहानवाज कंपली, प्रसाद जगताप, संतोष जाधव, प्रभाकर मनक्याल, अक्षय नंदाल, शुभम कारमपुरी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, सविता दासरी, अनिता सुंचू, पद्मा मॅकल, माधवी गौडा, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सलीम शेख, विक्रम कारमपुरी, अक्षय चिलवेरी, प्रशांत जक्का आदी मान्यवर उपस्थित होते.