सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सोलापूर शहरांमध्ये हेल्मेट सक्तीला संभाजी ब्रिगेडचा विरोध : शाम कदम

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात सोलापूर शहरासह 45 शहरांमध्ये दुचाकी स्वरांसह पाठीमागे बसणाऱ्या सह प्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्ती च्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.

विना हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. या बाबत नवे बदल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील भागात विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्ती विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1988 चे कलम 129 प्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या कलम 250 नुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती 50 क्युबिक सेंटीमीटर पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन बसवलेल्या दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे तसेच सोलापूर शहरात गेल्या एक-दोन वर्षा पासून जड वाहतुकीस सकाळी सहा ते रात्री 10 पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे शहरातील वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित असतो त्यामुळे शहरात अपघाताचे व अपघातातील मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प असून शहरातील वर्दयीच्या ठिकाणी दोन दोन हेल्मेट वागवणे अवघड आहे त्यामुळे सोलापूर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, सिताराम बाबर, प्राजक्ता बागल, अरविंद शेळके, सोहेल सय्यद, सुलेमान पिरजादे, फिरोज सय्यद, शेखर चौगुले, मल्लिकार्जुन शेवगार, सचिन होनमाने, श्रवण साळुंखे, रुपेश किरसावंगी, गौरीशंकर वरपे, मल्लिकार्जुन शेवगर, सुमित मंजूरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!