वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना 12 हजार नोटीसा 7 हजार सन्मस कोर्टाच्या माध्यमातून काढण्यात आले : सुधीर खिरडकर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागावी त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या याचबरोबर नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने दररोज 600 च्या जवळपास नागरिकांवर वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल कारवाई करतोय परंतु दंड भरण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक दंडाचे विषय लोक आदालत मध्ये संपतात 14 डिसेंबर रोजी लोक अदालितेचा आयोजन करण्यात आलं आहे. 12 हजार नोटीसा आणि 7 हजार सन्मस कोर्टाच्या माध्यमातून काढण्यात आले आहेत. अनेकजण पैसे भरत आहेत परंतु अनेक जण अद्याप पैसे भरलेले नाहीत लोक आजारांमध्ये दोन नोटीसा देऊनही न हजर राहणाऱ्या नागरिकांना वॉरंट काढण्यात आला आहे. नागरिकांनी ऑनलाईन या प्रत्यक्ष दंड भरून घ्यावेत आणि पुढील होणारी कारवाई टाळावी.
फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, मॉडीफाय सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग, यासह अनेक वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आपण कारवाई करतोय हे सर्वांना माहीत आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही त्यासाठी हे दंड करावे लागतात. कोणावरी आपण चुकीची कारवाई करत नाही प्रत्येक घटनेचे फोटो आपल्याला असतात तुमच्यावर चुकीची कारवाई झाली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एसीपी कारल्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. चुकीचा दंड लागला असेल तर तो रद्द करणे तर तो देखील कायद्यात आहे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले.