श्री कॉम्पुटर्सला सर्वोत्कृष्ट संगणक संस्थेचा पुरस्कार

सोलापूर : प्रतिनिधी
महाराराष्ट्र ज्ञान महामंडळाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली.या सभेत रामलाल चौक येथील श्री कॉम्प्युटर्स ला सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्था हा पुरस्कार देण्यात आला .MS-CIT ,क्लिक कोर्सेसचा सर्वाधिक निकाल ,विध्यार्थी संख्या ,सुपर परफार्मिंग इन्स्टिटयूट ,समाजोपयोगी उपक्रम या प्रकारात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहातील या सभेत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक माननीय विना कामत मॅडम आणि रिजिनल मॅनेंजर महेश पत्रिके सर,रोहित जेऊरकर सर यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री कॉम्प्युटर्स चे संस्थापक सचिन तिकटे व संचालिका सौ.शामबाला तिकटे यांना प्रदान करण्यात आला.या पुरस्कारांमध्ये सन्मानचिन्ह ,प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.संपूर्ण वर्षभरात MKCL चे सर्वच पुरस्कारप्राप्त करणारी संस्था ठरली.
श्री.कॉम्प्युटर्स ही सोलापूर शहर व कामती (बु.),डोणगाव अशा तीन ठिकाणी सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण देणारी शासनमान्य संस्था आहे.ह्या संस्थेमध्ये गेली २० वर्षांपासून आजपर्यंत १८००० पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले आहे.या तिन्ही ठिकाणी गेल्या २० वर्षांपासून सतत संगणकीय, व्यावसायिक ज्ञान देऊन अनेक विध्यार्थ्यांना जॉब मिळवून देण्यासाठी तसेच डिजिटल टेकनॉलॉजि चा प्रभावी वापर करण्यामध्ये आमची संस्था कार्यरत आहे.या संस्थेमध्ये MS-CIT, Tally, Computer Typing, Software, Hardware, desining, AI-ML, Coding आदी अनेक व्यावसायिक कोर्सेस अतिशय प्रभावीपणे शिकवले जातात.
गेली दोन वर्षांपासून सारथी ,अमृत कलश ह्या महामंडळामार्फत MKCL च्या माध्यमातून मराठा समाज्यातील व अमृत मध्ये येणाऱ्या समाज्यातील विध्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक कॉम्पुटर डिप्लोमाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.याचा लाभ आतापर्यंत २५० पेक्षा जास्त विध्यार्थ्यानी घेतला आहे. हे यश संपादन करण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील आमचे विध्यार्थी, पालक, आमचे हितचिंतक तसेच संस्थेच्या संचालिका सौ.शामबाला तिकटे व सहशिक्षक प्रियंका दसाडे, प्रतीक्षा कांबळे, सुषमा व्हनमाने, वैष्णवी मसरे, लक्ष्मी निंबाळकर, पूजा दसाडे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.