डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अनास्था दाखविण्याऱ्या व जातीवादी मानसिकतेतून उद्धट वर्तन करणाऱ्यावर कारवाई करा

सोलापूर : प्रतिनिधी
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त् सालाबादा प्रमाणे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापुर येथे प्रांगणात वर्षानुवर्षे प्रशासनाकडुन अभिवादन केले जाते. ०६ डिसेंबर २०२४ रोजी सालाबादाप्रमाणे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित् अभिवादन करण्यास डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापुर येथे हजर राहीले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्वच्छता, हार फुले व इतर अभिवादनाची तयारी आढळून आली नाही.
वास्तवीक पाहता, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली महापुरुषांच्या अभिवादनाचे सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले जाते याही वर्षी म्हणजे दि.०६/१२/२०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यासाठी तयारी करणे आवश्यक होते, तसेच प्रशासकीय अधिकारी श्री शैलेंन्द्रसिंग मिठठुलाल जाधव, हे अभिवादनाचे दिवशी महाविद्यालयात उपस्थित असणे आवश्यक होते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे हे माहित असताना देखील जाणीव पूर्वक जातीवादी मानसिकतेतून श्री शैलेंन्द्रसिग मिठठुलाल जाधव यांनी या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यालयात येण्याचे टाळले, याबाबत उपस्थितांनी श्री. जाधव यांना मोबाईल फोन वरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त् अभिवादन करण्यासाठी उपस्थित नसल्याबाबत विचारणा केली असता प्रशासकीय अधिकारी यांनी माझी तब्येत ठिक नाही व मला जुलाब (लुज मोशन) सुरु असल्याने कार्यालयात उपस्थित राहू शकणार नाही असे सांगीतले होते. परंतु, अभिवादनासारखा कार्यक्रम आपणास महत्वाचा वाटत नाही का असे विचारले असत व्यक्ती काही वेळातच कार्यालयात उपस्थित राहिन. महाविद्यालय प्रशासनाकडून महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी कार्यक्रमा करिता उशीर करण्यात आली असून सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमास नियोजन आजतागायत हरि प्रसाद राऊळ करीत आले आहेत परंतु दि.०६/१२/२०२४ रोजी तेही कार्यालयीन वेळेत अनुपस्थित होते. श्री. हरिप्रसाद राऊळ यांना मोबाईल फोनवरून विचारणा केली असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादनावाल ार्यक्रम करावा असे शासनाचे काही परिपत्रक आहे का अशी उलट विचारणा केली व पारण कार्य कसल्यामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम करता येणार नाही असे बेमुर्वत्तपणे व उद्धटपणे सांगीतले. अशाप्रकारे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यास व पुष्पहार अर्पण करण्यास प्रशासकीय अधिकारी श्री शैलेन्द्रसिंग मिठठुलाल जाधव व कर्मचारी श्री. हरिप्रसाद राऊळ यांनी अलिखित बंदी घातली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अनास्था दाखविली व जातीवादी मानसिकतेतून उदघट वर्तन केले याचा जाहीर निषेध कर्मचारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय अधिकारी श्री शैलेन्द्रसिंग मिठठुलाल जाधव व श्री हरीप्रसाद राऊळ यांनी कार्यालयीन वेळेत जातीवादी मानसिकतेतून, महापरिनिर्वाण दिनी अनुपस्थित राहून, अभिवादन करण्यास अलिखीत बंदी घालून महापुरुषाबद्यल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदान्वये, तसेच राष्ट्र पुरुषांचा अपमान करणे व समाजात तेढ निर्माण करणे याकरीता त्यांच्याविरुदघ् आपल्या स्तरावरुन गुन्हा नोंद करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.
संपूर्ण भारत देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेवर चालतो, अशा भारताची व बहुजन समाजाची अस्मिता असणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान राष्ट्र पुरुष यांचा अपमान करुन सर्व अधिकरी व कर्मचारी यांच्या अस्मितेला ठेच पोहचविली आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकरी श्री शैलेन्द्रसिंग मिठठुलाल जाधव व श्री हरीप्रसाद राऊळ यांना निलंबित करुन त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच सदरील कृतीच्या निषेधार्थ १० डिसेंबर २०२४ पासुन सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याकडून काळ्या फिती लावुन निषेध व्यक्त करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी. अशी माहिती डॉ मस्के, दिनेश श्रीराम, वैभव माने, सचिन सोनवणे, ज्योती शिंदे, सविता तीर्थे, विश्वनाथ भोसले, अमित वाडे, सुधीर सलगर, राजू माने, विजयकुमार कांबळे, प्रतीक शिवशरण, सागर रजपूत, वसीम खान, यांनी दिली.