बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या अन्यथा जशास तसे उत्तर देऊ : सकल हिंदू समाज सोलापूर
बांगलादेशाचा झेंडा आणि राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला जोडोमार करत प्रतिमेचे दहन, हिंदू न्याय यात्रेस हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सात रस्ता चौक येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवरायांचे पूजन करून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही न्याय यात्रा काढण्यात आली. यानंतर बांगलादेश झेंडा आणि तेथील राष्ट्राध्यक्षांच्या फोटोला जोडोमार करत त्याचे दहन करण्यात आले.
बांगलादेशात हिंदूवर अन्याय त्याच्यावर होत आहे हिंदूचे घर जाण्याचे मंदिर पाडण्यात येत आहेत अशा घटना घडत आहे त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत आज सोलापूर शहरांमध्ये हिंदू संघटनेतर्फे न्याय यात्रा काढण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने हिंदू बांधवांनी विविध मागण्या सरकार समोर मांडले आहेत येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये होणारे हिंदू वरती अन्याय अत्याचार हे थांबले गेले पाहिजे अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सरकारला इशारा देखील यावेळी दिला आहे.
यावेळी बोलताना भाजप आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बांगलादेशांमधील हिंदूंचा आवाज आम्ही हिवाळी अधिवेशनात मांडू आणि त्यांना न्याय देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. महाराष्ट्रातील आणि भारतातील बांगलादेशी घुस्कोरांना हाकलून लावू. हिंदूंसाठी देशभर एकतेचे आंदोलन उभा करून.
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुस्लिमांना इस्कॉन मंदिर अन्नदान कपडे वाटप करून त्यांना करोना काळात सांभाळलं होतं. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर इस्कॉन मंदिरातील चिन्मय कृष्णदास आणि हिंदू बांधवांनी मुस्लिमांना नेहमी मदत केलेली आहे. हिंदूंवर अत्याचार करणे ही इस्लामची संस्कृती आहे का असे म्हणत सकल हिंदू समाज न्याय यात्रेचे आयोजक सुधाकर बहिरवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी सकल हिंदू समाज न्याय यात्रेस ह.भ.प लक्ष्मण महाराज चव्हाण, आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, सकल हिदु समाज समन्वयक सुधीर बहिरवाडे, आबांदास गोरंटला, बजरंग दल नागेश बंडी, हिंदुराष्ट्र सेना रवी गोणे, ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, इस्कॉन टेम्पल चे पवन हरीनामदास,
बालयोगी सज्जन महाराज, सतीश आनंदकर, समर्थ बंडे, तेजस शहा, आनंद मुसळे, महिला सदस्य रोहणीताई तडळवकर, विजयाताई वडेपल्ली, श्रीकाचंना यन्नम, नरसुबाई गदवालकर, अश्विनी चव्हाण, युवा नेते लतेश हिरवें, नंदकुमार झवर यांच्यासह हजारो हिंदू बांधव युवक महिला वकील बांधव इंजिनिअर आर्किटेक्चर डॉक्टर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.