जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या उमेदवारालाच मतदान झाले पाहिजे : ॲड कोमल साळुंखे-ढोबळे.
बहुजन रयत परिषद कुणाची ताकद वाढविणार, कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर : प्रतिनिधी
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी एवढी प्रतिष्ठेची केली आहे की यामध्ये सर्वसामान्य जनता कुठेच दिसत नाही. ज्याला त्याला फक्त सत्तेची खुर्ची पाहिजे. परंतु जो उमेदवार कायम आपल्या सोबत राहील, मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देईल, अशाच उमेदवाराला मतदान करणे, है सुजाण मतदार म्हणून आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
हैद्रा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, खरंतर स्नेहभोजन है एक निमित्त असतं एकत्र येण्याचे. या एकत्र येण्यातून विविध विषयांवर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आपापसात एकोपा वाढती आणि हीच एकीची ताकद परिवर्तनाला विधायक दिशा देते.
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरु झाहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतांची गोळाबेटीज करत आहे. उमेदवारांकडून विविध समाजाला, संस्था, संघटनांना, तरुण मंडळांना आमिषे दाखवली जाताहेत. अशा वेळी आपल्या संघटनेची नेमकी काय भूमिका असावी, याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, बहुजन रयत परिषद या आपल्या लढवय्या संघटनेचे आपण सगळे लढवय्ये शिलेदार आहात. गेली 40 वर्षे ही संघटना बहुजनांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील गावागावात, खेडोपाड्यात संघटनेच्या शाखा स्थापन होत आहेत. संघटनेची ताकद पहिल्यापेक्षा आता दुपटी-तिपटीने वाढली आहे. प्रशासन देखील आपल्या आंदोलनाची दखल घेत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न सुटू लागलेत. सांगायचा उद्देश हाच की आता सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात पोहोचलेल्या संघटनेची ताकद आपल्या पाठीशी असावी, असं आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला वाटू लागले आहे. आपल्या संघटनेची ताकद एवढी मोठी आहे की कोणत्या उमेदवाराला निवडायचं आणि कोणत्या उमेदवाटाला पाडायचं, हे आपण सहज करु शकतो. म्हणूनच या निवडणुकीत बहुजन रयत परिषद कुणाची ताकद वाढविणार, कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.