सोलापूरदेश - विदेशधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक
संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पालिकेच्या वतीनं अभिवादन

सोलापूर : प्रतिनिधी
बुरुड समाजाचे आराध्य देवत व सामाजिक समतेचे प्रणेते शिवभक्त मेदार केतय्या तथा संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त कॉन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस नगर अभियंता सारिका आकूलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मेनका कुर्डे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, सूर्यकांत शेंद्रे, विठ्ठल साळुंखे, अरुण साळुंखे, पंडित वडतीले, रमेश शेंद्रे, नवनाथ सुरवसे, भारत वडतीले, विष्णू साळूंखे, विठ्ठल सळूंखे, संगीता वडतीले, ज्योती वडतीले, रेणुका शेंद्रे, अंबादास वडतीले, शिवानंद वडतिले, मारुती साळूंखे,आदी मान्यवर उपस्थित होते.