सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत करणार : कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणार आहे. त्यासाठी वि‌द्यापीठ आर्थिक तरतूद तयार करत असल्याची माहिती डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले

दक्षिण आफ्रिका येथील दर्बन येथे झालेल्या अकराव्या कॉमनवेल्थ कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भुवनेश्वरी जाधव हिचा सत्कार कुलगुरू डॉ. महानवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालय व वि‌द्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंना आर्थिक मदत करावयाचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा संचालक अतुल लकडे बालाजी अमाईन्सचे मल्लिनाथ बिराजदार, सिनेट सदस्य डॉ. वीरभद्र दंडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. व्ही बी पाटील तसेच संकुलातील संचालक प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!