राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून महापालिकेचा कोटींचा फायदा, नागरिकांनी दिला प्रतिसाद, अधिकाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करणेत आले आहे. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक आदालातासाठी उपस्थित असलेले पी.पी पेठकर (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर) यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी रेवण पाटील (सहाय्यक लोक अभिरक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) विधान सल्लागार संध्या भाकरे, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर, भूमी मालमत्ता अधीक्षक रजाक पेंढारी, सूर्यकांत खसगे, दत्तात्रय माढेकर, अविनाश भावीकर, एम. एस शिंदे, (सी.एस जमाखर्ची) सतीश बुरला तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे 24 हजार व भुमी व मालमत्ता विभागाकडील 1100 थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडी करीता दाखल करण्यात आलेली होते. दाखल प्रकरणनिहाय मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांचे मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
तसेच महापालिकेच्या परिसरामध्ये लोक आदालतचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला. यावेळी मालमत्ता कर विभागातील इतक्या व्यक्तींनी एकूण मिळकतदार 5046 एकूण वसूल झालेली असून इतके रक्कम 13 कोटी 94 हजार 466 रुपये सवलतीचा लाभ घेतला आहे. तसेच भूमी मालमत्ताकडील 1109 पैकी 140 सहभाग घेतला असून 1 कोटी 21 लाख 7 हजार 523 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
लोक अदालतमध्ये मिळकतदारांच्या धकबाकीतील नोटीस फि, वॉरंट फि व शास्ती ची जी रक्कम आहे त्यामधील 50% रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची “ड” प्रकरण 8 कराधान नियमातील नियम 51 नुसार सुट म्हणून देण्यात आले आहे. सबब जास्तीत जास्त् मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालत च्या माध्यमातून देण्यात आले आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले. तसेच ज्या मिळकतदारांना नोटीसा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदारना ही 50% शास्ती माफिचा लाभ देण्यात आले आहे.