क्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
परभणी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन, सोलापुरात युवा भीमसेन आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी
परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान शिल्पाची विटंबना च्या निषेधार्थ युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
कोबिंग ऑपरेशन, महिला, विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन काढून बेदम मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ते गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा महाराष्ट्र भर उग्र पद्धचे आंदोलन करण्यात येईल, या मागणीच्या अनुषंगाने हे आंदोलन असल्याची माहिती युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिली.
यावेळी विकास गायकवाड, जुबेर शेख, हुसेन बागवान, मल्लू कांबळे, परशुराम आई्यगोले सविता भासले, आणि संघटनेच्या महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.