सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी

सोलापूर प्रतिनिधी
परभणी येथील पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करा या मागणी करत भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ लावण्यात आलेल्या संविधान प्रास्ताविकेची विटंबना केल्यामुळे उद्भवलेल्या उद्रेकात तेथील पोलीस प्रशासनाने भीम अनुयायी यांना अमानुष अशी मारहाण केली. अनेकांना मोठ्या गुन्हात अटक केली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणात न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करावी. अशी मागणी करत राज्य सरचिटणीस वाघमोडे व पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम व शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. प्रारंभी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निदर्शने करण्यात आले. व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी प्रमिला तूपलवंडे, अड कमरुनिसा बागवान. सध्या काळे, शोभा बोबे, नसरीन शेख, राजश्री साबळे मयूर तळभंडारे, प्रकाश बनसोडे, रफिक शेख, सलीम मुल्ला, गणेश बंदनशिवे भारती रसागर, समिन साबळे, राजा नागटिळक, कीर्ती शिवशरण, मनोज लोंढे, इब्राहिम शेख, समीर मुजावर, अमोल रणशिगारे, मायाभाई कांबळे, पंडित गायकवाड, सोनु सुरते, बाबा कोणे, विकी सुरवसे, राज लांडगे, सचिन सावंत, संजय जाधव तात्या रणदिवे, गणेश वाघमारे, श्रीकांत गायकवाड, विकी लोंढे, अभिषेक पाटोळे, निखील पवार, चंद्रकांत कसबे, अभिषेक डोलारे, सतीश इंगळे, सोन्या कांबळे, प्रमुष्ध कदम, प्रबुद्ध कदम, प्रतिक कदम आदि पदाधिकारी बहुसंख्याने यावेळी उपस्थित होते.