भावी अनेक प्रभावी मात्र एक, अस्मिताताईं ची वारी गुणवंदाच्या दारी अभियानातून मध्यच्या मोर्चे बांधणीला केली सुरुवात

सोलापूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश राज्यभर दिले आहेत त्याचा भाग म्हणून “अस्मिताताई ची वारी.. गुणवंतांच्या दारी..” या नव्या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, उपनेत्या शितल देवरूखकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या वारीची सुरूवात संगमेश्वर महाविदयालयाच्या संत वाड:ग्मयाच्या अभ्यासक प्रा.डॉ.अश्विनी अविनाश जोग यांच्या गौरीशंकर अपार्टमेंट मध्ये त्यांच्या स्वगृही भेट देऊन व त्यांचा सन्मान करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या अनोख्या उपक्रमाच्या संयोजिका शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केले व या कार्यक्रमाचा हेतु विषद केला. शिवाय कॉलेज जीवनातील आठवणीना उजाळा दिला.
शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून हा गुणीजनांचा सन्मान प्रेरणादायी आहे. समाजातील असे गुणीजन हे एक दिपस्तंभा प्रमाणे असतात. त्यांचे आशिर्वाद मोलाचे असतात. खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाज कारण व २० टक्के राजकारण हे तत्त्व या विशेष कार्यक्रमातुन पुर्ण होत आहे. असे सांगुन अस्मिता गायकवाड यांच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनेत्या शितल देवरूखकर यांनी देखील कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
डॉ.अश्विनी जोग यांनी या नव्या संकल्पनेचे विशेष कौतुक करून अस्मिता ही माझी गुणी विद्यार्थीनी होती. आज ती जे सामाजिक कार्य करीत आहे त्यास शुभेच्छा व आशिर्वाद असल्याचे सांगून सन्मान केल्या बद्दल आनंद व्यक्त केला. अस्मिता ताईंच्या या कल्पकतेचे ही त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी ॲड. सूरेश गायकवाड, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, ॲड अजित करंदीकर, शहर उपप्रमुख चंद्रकांत मानवी, गौरीशंकर अपार्टमेंट चे संचालक शिवाजी चवरे, संतोष गद्दी, दयानंद बादगुडे, राजेश भोसेकर, शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, ज्योती माळवदकर, जोहरा रंगरेज, जयश्री पाटील, मंगल थोरात, प्रियंका वाघमोडे, जेष्ठ कवयित्री सुनेत्रा पंडित आदींसह अपार्टमेंट मधील सदस्य उपस्थित होते.