मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल पुन्हा उपोषणाला बसणार

सोलापूर : प्रतिनिधी (जालना)
मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी येत्या २५ जानेवारी पासून जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.
अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उपोषणाच्या तारखेची घोषणा केली. २५ जानेवारीच्या आत सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर २५ जानेवारी २०२५ ला पुन्हा एकदा स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू करणार. असा इशारा त्यांनी दिला.
उपोषणाची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या मागण्या तातडीने मान्य करा. २५ जानेवारीला महाराष्ट्रातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीत यावे असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता सामूहिक उपोषण करणार आहोत. कोणावरही उपोषण करावे असे बंधन नसणार आहे.