प्रभाग 22 येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, विविध मूलभूत सुविधांसाठी प्रयत्नशील : किसन जाधव

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक 22 येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या हेड अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून १६,०,७९३० रुपये खर्चित रेवणसिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथील रस्ते काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.
दरम्यान या विकास कामाचे शुभारंभ प्रसंगी बंडया हिरेमठ स्वामी, श्रीमंत सुरवसे, राहुल हत्ती, हनुमंत जाधव, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, मल्लू जाधव, अफजल पठाण, संतोष बांदेकर, समीर मुलाणी, सतीश माने, सोनू पतंगे,विश्वनाथ सुरवसे, श्रीकांत गोळसर, नागेश बनसोडे,
अमोल जमादार, पिंटू दबडे, सुनील कांबळे संदीप बेदरकर, बिराजदार मामा, सिद्राम म्हेत्रे, भारत साळुंखे, संभाजी सुरवसे, गौरीताई पाटील,जयश्री मैत्रे, सिताबाई खंदारे, अनिता पवार, द्रोपदी चव्हाण, मीना चव्हाण, सुरेखा म्हेत्रे,वैशाली रणदिवे, ललिता परदेशी, सुरेखा सुरवसे, सविता कदम, अनिता सुरवसे, अनिता चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधिवत पुजनाने रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.
प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसह सर्व विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकार आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक २२ चा सर्वांगीण विकास साधला.
प्रभाग क्रमांक २२ येथील बहुतांश रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहेत रस्त्याबरोबरच लाईट, पाणी, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व वीज अशा अन्य मूलभूत सुविधांसह सर्वच विकास कामे करण्यास प्राधान्यक्रम यापुढील काळात देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजित पवार यांच्या सहकार्याने सर्वाधिक निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी या रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी व्यक्त केलं.
या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी या परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.