सोलापूरकरांच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह

सोलापूर : प्रतिनिधी
जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त वै. दा. का. थावरे भाऊ यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.डॉ. किरण महाराज बोधले • शहर अध्यक्ष ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी मिल कंपाऊंड भैय्या चौक सोलापूर येथे २९ डिसेंबर २०२४ वार रविवार ते ५ जानेवारी २०२५ वार रविवार पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.
सदर सप्ताहामध्ये काकडा आरती, श्री. संत तुकाराम महाराज गाथा भजनी पारायण, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन हरिकिर्तन, हरिजागर अशा अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहामध्ये संत महात्मे, संत परंपरेतील वंशज यांची किर्तनरूपी सेवा आयोजित करण्यात आली आहे व यामध्ये दि. २९ डिसेंबर रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ३० रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, ३१ रोजी ह.भ.प. बंडा तात्या कराडकर, १ जानेवारी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, २ रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, ३ रोजी ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर, ४ रोजी ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांची दररोज रात्रौ ७ ते ९ किर्तने होणार आहेत. दि.४/१/२०२५ वार शनिवार रोजी दुपारी ३ ते ६ पर्यंत सोलापूर शहरामध्ये दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. तसेच दि.५ जानेवारी सकाळी १० ते १२ ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
अशी माहिती गणेश महाराज शिंदे, सुरेश महाराज बोंगे, आदिनाथ महाराज जावळे, भास्कर महाराज पवार, दिगंबर महाराज फंड, लहू महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर महाराज जरब, श्रीकांत महाराज कोकिटकर, आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.