क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

2 लाखासाठी मुकादम बहिण भावाच अपहरण, अक्कलकोट दक्षिण पोलिसांच दुर्लक्ष, आरोपी व्हिडिओ कॉल द्वारे करत आहेत 7 लाखाची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मुकादम चे काम करत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपुर येथील शिवबा हट्टी यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी कामगार पाठवतो यासाठी 2 लाख रुपये घेतले. परंतु कामगार न आल्याने ते रक्कम ते देऊ शकले नाहीत याचा राग मनात धरून शिवबा हट्टी त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार, यशोदा काळे यांचे घरातून अपहरण केले.

फिर्यादी धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली परंतु अद्याप अपहरण होऊन पाच ते सहा दिवस झाले तरी देखील आरोपी अटक नाहीत.

या उलट आरोपी मात्र धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार यास झाडाला साखळीने बांधून ठेवल्याचे दाखवत आहेत. सात लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो अशी धमकी देत असल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली.

धमाबाई पवार (अपहरण कर्त्याची बायको)

भटक्या विमुक्त जातींच्या नागरिकांना नेहमी पोलीस सहकार्य करत नाहीत. अपहरण झालेल्या दोन्ही बहिण भावाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अक्कलकोट दक्षिणचे पोलीस जबाबदार असतील असा गंभीर इशारा महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी दिला.

 राजश्री चव्हाण (महिला अध्यक्ष, भटक्या जाती विमुक्त जमाती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!