सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

CET Cell : एमबीए, एमएमएस, एमसीए , तीन वर्षे एलएलबी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test cell) घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एमबीए, एमएमएस, एमसीए आणि तीन वर्षे एलएलबी (MBA, MMS, MCA, Three years LLB)अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेचे अर्ज 25 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करू शकतात.

सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रवेश पूर्व परीक्षांच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना एमसीए परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज कन्फर्म करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा 25 डिसेंबर ते 25 जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2025 26 या कालावधीत सीईटी सेलच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशासाठी या प्रवेश पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

सीईटी सेलच्या माध्यमातून एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमा साठी प्रवेश पूर्व परीक्षा अर्ज भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 27 डिसेंबर 2024 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत अर्ज नोंदणी व अर्ज कन्फर्म करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तारीख 20 मार्च 2025 आणि 21 मार्च 2025 या दिवशी घेतल्या जातील.मात्र या परीक्षेच्या संभाव्य तारखा आहेत, असे सीईटी असेल तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश पूर्व परीक्षांचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!