9 संघ आणि 100 महिला खेळाडू साडी नेसून खेळणार क्रिकेट, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘साडी प्रिमियर लीग’ चे आयोजन
सोलापूरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन असणारे 95 MYFM आणि Ileseum clubs मार्फत सुरू आहे, साडी प्रिमियर लीग

सोलापूर : प्रतिनिधी
95 MYFM कडून नेहमीच काही तरी खास उपक्रम राबवीले जातात. तसेच सोलापूरी महिलां करिता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 95 my fm आणि Ileseum clubs मार्फत सुरू असलेले ‘साडी प्रिमियर लीग’ जिथे महिला साडी नेसून क्रिकेट खेळत आहेत. ज्या मध्ये 9 संघ आहेत व 100 महिला खेळाडू आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रणितीताई शिंदे आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते SPL च्या विजेत्यांना मिळणाऱ्या ट्रॉफिचे अनावरण करून झाले असून आज दिनांक 29 मे रोजी साडी प्रिमियर लीग चा अंतिम विजेता संघ घोषित होणार आहे.
या साडी प्रिमियर लीग साठी हिलिंग हॅंड फिजिओथेरपी सेंटर, हॉटेल ओरिएंट इलाइट, आदर्श सुझुकी, स्पाईस & आइस इव्हेंट्स, हॉटेल जय पॅलेस इन, हॉटेल गंगा रेजेन्सी, हॉटेल अजिंक्य, हॉटेल सागा, इल्यूझियम क्लब हे टिम ओनर्स असून असोसिएट पार्टनर बझ लाउंज & गार्डन रेस्ट्रॉरंट बाय हॉटेल प्रथम, यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपसोसायटी लि. हे आहेत.