संत तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वराच्या चरणापाशी मन वृत्ती हवी : प्रकाश महाराज बोधले

सोलापूर : प्रतिनिधी
जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त वै. दा. का. थावरे भाऊ यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.डॉ. किरण महाराज बोधले, शहर अध्यक्ष ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी मिल कंपाऊंड भैय्या चौक सोलापूर येथे २९ डिसेंबर २०२४ वार रविवार ते ५ जानेवारी २०२५ वार रविवार पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.
सदर सप्ताहामध्ये काकडा आरती, श्री. संत तुकाराम महाराज गाथा भजनी पारायण, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन हरिकिर्तन, हरिजागर अशा अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहामध्ये संत महात्मे, संत परंपरेतील वंशज यांची किर्तनरूपी सेवा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २९ डिसेंबर रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन झाले आपल्या किर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची माहिती देत देवा तुझ्या चरणा जवळ माझी मन वृत्ती हवी याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सुधारणा असावी शिक्षण शिका परंतु संस्कार सोडू नका, काम क्रोध मत्सर लोभ आपलं जीवन उध्वस्त करताय यासह जीवनातील अनेक उदाहरणे देत त्यांनी मानवाला संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याच्या सूचना केल्या. प्रकाश महाराज बोधले यांच्या कीर्तनाने वारकरी आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी गणेश महाराज शिंदे, सुरेश महाराज बोंगे, आदिनाथ महाराज जावळे, भास्कर महाराज पवार, दिगंबर महाराज फंड, लहू महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर महाराज जरब, श्रीकांत महाराज कोकिटकर आणि वारकरी परिश्रम घेत आहेत.