सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक
माझा बाबा सिद्धिकी होण्यापूर्वी मला पोलीस सौरक्षण दया, धमकीप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांची पोलिसात धाव

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्याच्या गँग कडून अपहरण करुन आपल्याकडून खंडणी घेवून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे आपल्याला पोलीस सौरक्षण दया, अशी मागणी मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी केलीय.
रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत आपल्याला पोलीस सौरक्षण दया अशी मागणी केलीय. आपले अपहरण करुन आपल्याकडून खंडणी वसुल करुन आपली हत्या करण्यात येणार आहे तशी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार असल्याने आपल्या जीवितास धोका असून तात्काळ सौरक्षण मिळावे. माझा बाबा सिद्धिकी होण्यापूर्वी मला सौरक्षण मिळावे अशी मागणी रमेश कदम यांनी केलीय.