MIDC गुन्हे प्रगटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी, 6 गुन्हे उघडकीस आणत लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

सोलापूर : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासुन होत असलेल्या मोटार सायकल चोरी व घरफोड्या रोखण्याकरीता पोलीस आयुक्त एम. राजकुमार सो, पोलीस उप-आयुक्त (परि.) विजय कबाडे व सपोआ वि-१ अशोक तोरडमल यांनी वपोनि एमआयडीसी पोलीस ठाणे प्रमोद वाघमारे यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वपोनि MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नंदकिशोर सोळुंके यांचेसह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशीत केले होते.
दि. ०६/०७/२०२४ रोजी गुप्त बातमीदारांचे माहीतीवरुन चेतन हॉटेल गवळी वस्ती सोलापुर येथे आलो असता एका मोटार सायकल जवळ एक इसम रोडचे कडेला थांबलेला होता त्या गाडीच्या दोन्ही बाजुला नंबर प्लेट दिसत नव्हती .त्यामुळे त्यास जागीच ताब्यात घेतले त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राजु रसुलवेग शेख वय ३२ वर्षे रा.मु. औज पोस्ट मंद्रुप ता.दक्षिण सोलापुर जि. सोलापुर असे सांगीतले त्यानंतर त्याने सांगीतले की ही मोटारसायल चोरुन विक्री साठी माझा मित्र नामे सत्यवान रामहरी भोसले उर्फ शिरसट याने दिलेली होती. त्यानंतर त्यास पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन पोलीस ठाणे मोटारसायकल चोरीच्या अभिलेख पडताळला असता. सदरची मोटारसायकल ही एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ४६१/२०२४ भादविस कलम ३७९ प्रमाणे दाखल असलेली त्याचा क्र.MH-१३-DL-५४२२ अशी होती. त्यानंतर त्याच्याकडे अजुन कसून चौकशी केली असता त्याने सांगीतले की माझ्या मित्राने अजुन तीन मोटारसायकल विक्रीसाठी दिलेल्या आहेत त्या मोटारसायकल ह्या माझे औज मधील रहाते घरासमोरील मोकळ्या जागेत तीन मोटारसायकल, लावलेली आहेत असे सांगीतले. त्यानंतर सदर मोटार सायकल ह्या हस्तगत करून मोटार सायकल बाबत अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटार सायकल हया तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, वैराग पोलीस ठाणे, पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मोटार सायकल ह्या पोहेकॉ/७४५ डी के डोके यांनी जप्त करून ९,८५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच दि. ३१/०७/२०२४ रोजी ईस्कॉन मंदिर जवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दुपारच्या वेळेस एका घरासमोरून फिनोलेक्स कंपनीचे ०६ वायर बंडल चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याअनुषंगाने दाखल गुन्हयाचा अधिक तपास करीत असताना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ५४०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३ (५) या गुन्ह्यातील संशयित इसम हे चेतन हॉटेल जवळ, गवळी वस्ती येथे उभे आहेत अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथक सदर ठिकाणी पोहचलो. त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन इसम चेतन हॉटेलच्या पाठिमागील बाजूस असलेल्या मोकळया मैदानात बसलेले दिसले. त्यापैकी एक इसम हा त्याच्या ताब्यातील नंबरप्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटार सायकलवर तसेच दुसरा इसम हा तेथे असणाऱ्या दगडावर बसलेला दिसला. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता १) फरीद कलीम हिरोळी वय २१ वर्षे रा. १४१/२ विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर सध्या रा. शोभादेवी नगर प्लॉट नं ५, विष्णु नगर, सोलापूर २) (विधीसंघर्षग्रस्त वालक). त्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल व मोटार सायकलवर ठेवलेल्या वायरचे ६ बंडल बाबत विचारले असता त्यांनी वापरत असलेल्या सुझुकी कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस मोटार सायकलवर ईस्कॉन मंदिर जवळील एका बांधकाम चालु असलेल्या घरातुन सदरचे वायरचे ६ बंडल चोरी केले आहेत असे सांगितल्याने गुन्ह्यातील एकुण ९८,०००/- रू किंमतीचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
गुन्हयातील आरोपीकडुन एकुण ३,०३,०००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करून एकुण ०३ आरोपी अटक व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परि.) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वपोनि/प्रमोद वाघमारे, पोनि/विजय खोमणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/नंदकुमार सोळुंके, पोहेकॉ/राकेश पाटील, पोहेकॉ/एकनाथ उबाळे, पोहेकॉ/दिपक डोके, पोहेकॉ सचिन भांगे, पोना/मंगेश गायकवाड, पोकॉ/शैलेश स्वामी, पोकॉ/अमसिध्द निंबाळ, पोकॉ/अमोल यादव, पोकॉ/काशिनाथ वाघे, पोकॉ/दिपक नारायणकर, पोकॉ/अमर शिवसिंगवाले, पोकॉ/सुहास अर्जुन, पोकॉ/शंकर याळगी, पोकॉ/देवीदास कदम, पोकॉ/ भारतसिंग तुक्कुवाले, पोकॉ/९३१ डिगोळे यांनी बजावली आहे.