सोलापूरमहाराष्ट्र

तांत्रिक अँप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये 350 कंत्राटी कामगारांच्या जाहीर प्रवेश

सोलापूर : प्रतिनिधी (अहमदनगर)

महाराष्ट्र मध्ये तिन्ही विज कंपनी स्तरावरील कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन प्रणित तांत्रिक अँप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये अहमदनगर जिल्हयातील 350 कंत्राटी कामगारांचा सोहळा संपन्न झाला असल्याची माहीती तांत्रिक अँप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.

या महाप्रवेश सोहळ्याच्या कार्यकमाचे अध्यक्षपद राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी भुषावले, तर प्रमुख अतिथी म्हणून तात्रिक कामगार युनियनचे मार्गदर्शक ईब्राहिम हवालदार, केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोस्डे, उपाध्यक्ष बी.आर.पवार, सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस संजय उगले, राज्य सचिव आनंद जगताप, आर आर ठाकुर, सजय पाडेकर, प्रदीप पाटील, पांडुरंग पोटे , अनिल चव्हाण, सचिन चोरगे, तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य सरचिटणीस शेख राहील, अतुल पाटील थेर, प्रताप खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे यांनी राज्यातील कंत्राटी कामगारांचे होणारे शोषन यापुढे होणार नाही त्या विरुध्द संघटना आक्रमक भुमिका घेवुन वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्ग स्विकारेल. कत्राटी कामगारांनी आता हक्काच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना निश्चीतच न्याय मिळेल असे आश्वासित केले.

केंद्रीय सरचिटणीस तथा राज्याध्यक्ष तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन प्रभाकर लहाने यांनी कंत्राटी कामगारांना शास्वत रोजगारांची हमी, कंत्राटी कामगारांना आरक्षण, पदभरतीमध्ये शतप्रतिशत कंत्राटी कामगारांना सामावुन घेणे, विमा संस्क्षण, नियमित कामगारांप्रमाणे सुविधा व आर्थीक लाभ, कल्याण मंडळाची स्थापना, होणारी आर्थीक पिळवणुक, परिक्षेमध्ये अतिरिक्त वाढीव मार्क, शिकाऊ उमेदवाराना वाढीव आरक्षण, कंत्राटी कामगारांच्या सेवा काळाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सुट व ईतर प्रश्न हे शासन स्तरावर प्रलंबित आहे. राज्यातील कंत्राटी कामगार हा कायम कामगारांप्रमाणे काम करतो वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतो अशा कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकरीता शासन व प्रशासन उदासिन असते परंतु सन 2008 पासुन कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकरीता सर्वात जास्त आंदोलन करणारी कंत्राटी कामगार असोसिशन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न संघर्षाच्या माध्यमातुन सोडविण्यात येईल तसेच कंत्राटी कामगारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी 350 कंत्राटी कामगारांचा प्रवेश सपन्न झाला. कार्यकमाला शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते. कार्यकम यशस्वी करण्याकरीता तांत्रिक कामगार युनियन चे अहमदनगर जिल्हाच्या सर्व स्तरावरील पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!