श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा व ATM सुरु करा : ज्योतिबा गुंड

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे शहरातून तसेच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात. त्याच बरोबर येथे काम करणारे डॉक्टर, ब्रदर, नर्स व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी इतर काही अडचणीसाठी पैशांची गरज भासते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईक अचानक पणे हॉस्पिटलला येतात परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे एखादी शाखा नाही व एटीएम देखील नाही. याकरिता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एटीएम व राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी.
रुग्ण रुग्णांच्या नातेवाईक आणि येथील डॉक्टर, ब्रदर, नर्स यांना पैशाच्या आर्थिक व्यवहारात करिता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणता तीन ते चार किलोमीटर लांब जाता येऊ नये, यासाठी आपल्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये लवकरात लवकर एटीएम व एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी या आशियाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड, रुग्णसेवक रुपेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवराज विभुते व गणेश छत्रबंद यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांना निवेदन देण्यात आले.