अधिकाराचा गैरवापर करून एकाची फसवणूक, चौघांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हात आटकपुर्व जामीन मंजुर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील बिनशेती खुली जागे- वरील अर्जदारांचे नाव कमी न करता, परस्पर मोजणी करुन या मिळकतीचा सात बारा उताऱ्याची पोट हिस्से तयार करुन चौघांनी अधिकाराचा गैरवापर करुन इतर मिळकत धारकांना त्याचा फायदा करुन दिल्याची घटना घडली आहे.
ही घटना १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी ते ०९ नोहेंबर २०२३ रोजी पर्यंत, उपअधिक्षक भुमी अभिलेख, ता. उत्तर यांचे कार्यालयात, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे घडली. सुनिल वसंतराव पोतदार (वय-६४, रा. घर नं. ५२५, शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादी वरून नितीन सावंत, तबस्सुम सय्यद, मुकुंद काडगावकर, श्रीशैल काळे या चौघाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताचे कलम- 120-बी, 166, 166-ए, 420, 465, 466, 471 सह-34 प्रमाणे 26 नोहेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
यात अधिक हकिकत अशी की, फिर्यादी सुनील पोतदार यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील बिनशेती खुली जाग सव्र्व्हे नं. ३०६/१ यास नवीन सर्व्हे नं. १५४/१, या जागेचे एकुण क्षेत्र ०४ हे ७६ आर या मिळकतीवर फिर्यादी व फिर्यादीचे पाच चुलत भाऊ असे एकुण ६ जणांचे वारसाहक्काने मालकीचे संदर्भात अर्जदार यांचे नाव कमी का झाले नाही यांची कोणतीही खातरजमा केली नाही. तसेच – अर्जदार यांना मोजणी प्रकरणाची कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता अर्जदार यांचे गैरहजर नमुद मिळकतीचा परस्पर मोजणी करुन या मिळकतीचा सात बारा उताऱ्याची पोट हिस्से तयार करुन वरील चौघांनी अधिकाराचा गैरवापर करुन इतर -मिळकत धारकांना त्याचा फायदा करुन दिला आहे अशी फिर्याद दिली होती त्या मध्ये आटक होईल या भितीने त्यांनी आटकपुर्व जामीनाकरीता सोलापुर येथील मे.सेशनकोर्टात अर्ज ठेवला होता. त्यास मुळफिर्यादीच्या वतीने तसेच सरकारी वकिलांकडुन तिव्र विरोध दर्शवुन सदरचा गुन्हा हा गंभीरस्वररुपाचा असुन, आरोपींनी सरकारीपदाचा गैरवापर केला आहे आरोपींना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तीवाद करण्यात आला होता.
मे.सेशन जज्ज जे.जे.मोहिते यांनी ह्यापुर्वीच 02 डिसेंबर 2024 रोजी अंतरिम आटकपुर्व जामीन मंजुर केला होता मुळफिर्यादी यांच्या तिव्र विरोधानतंर सुध्दा मे.सेशन कोर्टांनी अर्जदार फिर्यादी यांचावतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन रक्कम रु 50,000/- प्रत्येकी प्रमाणे व साक्षीदारांवर दबाव आणणार नाही व चार्जशीट दाखल होई पर्यंत दर रवीवारी सकाळी ११ ते ०१ दरम्यान हजेरी लावुन अटकपुर्व जामिन ता १०-०१-२०२५ रोजी मंजुर केला यांत तबसुम सय्यद यांच्या वतीने ॲड.डी.एन.भडंगे, ॲड.एन.एन.भडंगे यांनी काम पाहिले.