सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

RTE शिक्षण हक्क चळवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड शिवाजी कांबळे यांची निवड

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथील महात्मा फुले निसर्ग सानिध्य प्रतिष्ठान रजि.संस्था सोलापूर या संस्थेची संलग्नीत असलेल्या आरटीई कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटना सोलापूर या महाराष्ट्रातील पहिल्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ॲड. शिवाजी कांबळे यांची निवड झाली आहे.

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस व आर.टी.ई.कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या हस्ते ॲड.शिवाजी कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी समाजातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थिती होते. महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी माध्यम व खाजगी संस्थेतील शाळेमध्ये आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दलित, आदिवासी वंचित समाजातील विद्यार्थ्यांना इतर श्रीमंत कुटुंबातील मुलांप्रमाणे चांगले शिक्षण मिळावे व पुढील उच्च शिक्षण सुध्दा नामांकित विद्यापीठातून घेता यावे, तसेच उच्च शाळेतील शिक्षणही मोफत मिळावे व त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावावा या उद्देशाने आरटीई कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटना सोलापूर या पहिल्या संघटनेची स्थापना सोलापुरात करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून विविध समाजातील विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींना आरटीई कायद्याअंतर्गत मोफत प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन दिले जाणार आहे व प्रवेशातील येणाऱ्या विविध अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे मत नूतन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी कांबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

तसेच या संस्थेमार्फत जाहीर आव्हान करण्यात आले की ज्या विद्यार्थ्यांना आरटीई द्वारे शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना या संस्थेमार्फत शालेय प्रवेशा संदर्भात मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे तरी त्यांनी शशिकांत कांबळे (संस्थापक,अध्यक्ष) ९८५०५६६००७, ॲड शिवाजी कांबळे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) ९९२२२४६१२३ या फोन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!