
सोलापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका सीमा पाटील यांनी मोहोळ शहरांमध्ये क्रांतीनगर,समर्थ नगर, नाईकवाडी नगर, सदाशिव नगर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ महिलांशी संवाद साधला.
मतदान कशाप्रकारे करायचे याचे प्रात्यक्षिक सर्व महिलांना दाखवण्यात आले, गॅस दरवाढ महागाई, जीएसटी या सर्वांना वैतागलेल्या महिलांनी प्रणिती शिंदेंना हाताला मतदान करून विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी या संवाद बैठकामध्ये उपस्थित होत्या.