सोलापूरराजकीय

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सोलापुरच्या विकासासाठी, सोलापुरच्या लेकीला मतदान करा, प्रणिती शिंदेंचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

हे मतदान लोकशाहीसाठी, संविधानसाठी, महागाई कमी करण्यासाठी, सोलापूरच्या विकसासाठी, आरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली. खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात. आता येत्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.

प्रणिती शिंदे यांनी शहरात पदयात्रा काढत प्रचाराचा शेवट केला. यावेळी सोलापुरच्या विकासासाठी तुमच्या सोलापुरच्या लेकीला मतदान करा. तसेच ही निवडणूक माझी एकट्याची असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असेल, असे ही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील प्रचाराचा शेवट पदयात्रेने झाला. कन्ना चौक येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. ही पदयात्रा, जोडभावी पेठ, चाटला कॉर्नर, घोंगडे वस्ती, गुरूदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ पोलिस चौकी, सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, मेकनिक चौक, भागवत टॉकिज या मार्गे निघाली पदयात्रेचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेमध्ये माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिव बंटी शेळके, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, ऊत्तमप्रकाश खंदारे, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, शिवसेना नेते अजय दासरी, अमर पाटील, गणेश वानकर, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादीचे भारत जाधव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, यू. एन बेरीया, मनोहर सपाटे, प्रताप चव्हाण, एम एच शेख, विष्णू कारमपुरी, महेश धाराशिवकर, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!