LLB 3 सिईटी 2024 स्कोअर कार्ड प्रसिध्द, Percentile Score मुळे विद्यार्थी संभ्रमात, सीईटी सेल कडे विद्यार्थ्यांच्या वाढल्या तक्रारी
Percentile Score मध्ये डिजिटल संख्या 8 तर काही जणांची 9, अभ्यास करून देखील गुण कमी दाखवल्याने विद्यार्थी नाराज

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड त्यांच्या लॉगिन मधून डाऊनलोड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे परिपत्रक सीईटी सेल तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलच्या माध्यमातून 12 व 13 मार्च रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असूल विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी या स्कोर कार्डच्या आधारे प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये स्कोर कार्ड दिसणार आहे.
परंतु Percentile Score मुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत अनेक विद्यार्थ्यांना गुणदर्शनाची ही पद्धत कळाली नाही. त्यातून परसेंटाइल स्कोर चे काही जणांचे अंक आठ आहेत तर काही जणांचे नऊ आहेत. अभ्यास करून देखील मार्क न मिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले आहेत. तज्ञ शिक्षकांनी सीईटी सेलच्या मेलवर तक्रार करून, हेल्पलाइन नंबर ला फोन करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले आहे. दोन वर्ष अभ्यास करून पेपर उत्तमरीत्या लिहून देखील मार्क कमी पडत असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान होऊ नये यासाठी सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन तक्रारीचे निरसन करत त्यांचे वर्ष वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.