पुणे येथील प्रोटॉन कप 2025 तायक्वांदो स्पर्धेत रावजी सखाराम हायस्कूलच्या खेळाडूंची सुवर्णभरारी

सोलापूर : प्रतिनिधी
प्रोटॉन क्लब पुणे येथे आयोजित तायक्वांदो स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्था संचलित रावजी सखाराम हायस्कूलच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य पदकासह एकूण 9 पदकांची कमाई करत स्पर्धेमध्ये रावजी सखाराम हायस्कूलचा दबदबा कायम राखला. मागील काही वर्षांपासून रावजी सखाराम हायस्कूल आणि तायक्वांदो असे समीकरणच झाले आहे.
सानिका गायकवाड, दिव्या कोने, अंश जाधव, ओम जगदाळे यांना सुवर्ण पदक, सृष्टी शिंदे, प्रलय माने यांना रौप्य पदक तर नम्रता बनसोडे, वैष्णवी शिंदे, राज जाधव यांना कांस्यपदक मिळाले.
या यशाबद्दल संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, संस्था सदस्य प्राचार्य डॉ सुरेश ढेरे, स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य केतनभाई शहा, उद्योजिका माधुरीताई पाटील, प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर, मुख्याध्यापक संतोष वालवडकर, मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड, अमर देशमुख, श्रीम. चंद्रकला भोरे, क्रीडा शिक्षक अझहर शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक, पालक, माजी विद्यार्थी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.